कळंबोली दि.२८: शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या प्रमाणे कृती पाहिजे बडबड नको या नुसार लोक वर्गणीतून शाळा शाळा सुंदर रित्या कशी उभी करायची हे समाजाला प्रेरणा देणारे काम हेमलता पाटील यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. शैक्षणिक कार्य करीत असताना त्यांनी शाळा हेच कुटुंब समजून केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार सुधागड एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव रविकांत घोसाळकर यांनी कळंबोली येथे हेमलता पाटील सेवापूर्ती समारंभ सोहळा निमित्त काढले.
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोलीतील मराठी प्राथमिक विभागाच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील ह्या ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या सेवापूर्ती सोहळा कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलाच्या सभागृहात विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे सचिव रविकांत घोसाळकर, सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे, संस्थेचे प्रशासन अधिकारी मिलिंद जोशी, पनवेलचे शालेय पोषण आहार अधीक्षक नवनाथ साबळे, मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील,मुख्याध्यापिका कल्पना कुलकर्णी, माजी मुख्याध्यापिका स्मिता पाटील, अरुणा उरणकर, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक माजी विद्यार्थी, तसेच हेमलता पाटील यांच्यावर प्रेम करणारे हितचिंतक नातेवाईक, स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हे मिळता पाटील यांनी केलेल्या प्रदीर्घ शैक्षणिक कार्याची ओळख करून देणारी चित्रफीत उपस्थित मान्यवरांना दाखवण्यात आली. अत्यंत दिमखदार, अविस्मरणीय सोहळा विद्यालयाच्या सर्व शिक्षक कर्मचारी वर्गांनी आयोजित केला होता. यावेळी त्यांना शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हेमलता पाटील यांनी केलेले शैक्षणिक काम ते आम्हा सर्वांना निश्चितच प्रेरणा देणारे असून त्यांनी केलेल्या विविध कामातून आम्हाला बोध घेण्यासारखे जे काही आहे ते आम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचे काम भविष्यात निश्चित केले जाईल. आगामी काळातही शाळेच्या जडणघडणीसाठी हेमलता पाटील यांची मोलाची साथ ही विद्यालयाला मिळणार असल्याचे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी सांगितले.

💥पोटे मसाले तर्फे दिवाळीच्या शुभेच्छा

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!