पनवेल, अलिबाग, कर्जत, उरण, महाड, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात ३४ अर्ज दाखल
रायगड दि.२८:- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरण्यास दि.२२ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात कर्जत, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात ३१ उमेदवारांची ३४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.

१८८ – पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये आज ७ उमेदवारांनी ९ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.
प्रशांत राम ठाकूर (भारतीय जनता पार्टी) २ अर्ज, कांतीलाल हरिश्चंद्र कडू (अपक्ष), कांतीलाल हरिश्चंद्र कडू (लोकमुद्रा जनहित पार्टी), लीना अर्जुन गरड (शिवसेना, उबाठा), अरुण जगन्नाथ भगत (भारतीय जनता पार्टी), पवन उत्तमराव काळे (भारतीय जन सम्राट पार्टी), गजेंद्र कृष्णदास अहिरे (बहुजन समाज पार्टी), डॉ.वसंत उत्तम राठोड (डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन)

१८९ – कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये आज ६ उमेदवारांनी ७ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.
महेंद्र सदाशिव थोरवे (शिवसेना), नमिता सुधाकर घारे (अपक्ष), किरण खंडू ठाकरे (भारतीय जनता पार्टी), किरण खंडू ठाकरे (अपक्ष) , नितीन नंदकुमार सावंत (शिवसेना, उबाठा), श्रीराम बळीराम महाडिक (बहुजन समाज पार्टी), सुधाकर यादवराव घारे (अपक्ष)

१९० – उरण विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.
सुनील मारुती गायकवाड (बहुजन समाज पार्टी), मनोहर भोईर (शिवसेना, उबाठा), निलम मधुकर कडू (अपक्ष), बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष)

१९१ – पेण विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.
रविंद्र दगडू पाटील (भारतीय जनता पार्टी) , देवेन मारुती कोळी (वंचित बहुजन आघाडी), अतुल नंदकुमार म्हात्रे यांच्या वतीने सूचक प्रतीक सदानंद म्हात्रे (शेकाप), प्रसाद केळुराम भोईर (शिवसेना, उबाठा)

१९२ – अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये आज ३ उमेदवारांनी ३ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.
महेंद्र हरी दळवी (शिवसेना), कुमारी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष), मंदार एकनाथ गावंड (अपक्ष)

१९३ – श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये आज ३ उमेदवारांनी ३ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.
संतोष तानाजी पवार (अपक्ष), राजेंद्र मधुकर ठाकूर (इंडियन नॅशनल काँग्रेस), कृष्णा पांडुरंग कोबनाक (अपक्ष).

१९४ – महाड विधानसभा मतदार संघामध्ये आज ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र सादर केले असून ते पुढील प्रमाणे.
स्नेहल माणिक जगताप (शिवसेना, उबाठा), भरत मारुती गोगावले (शिवसेना), श्रीयश माणिक जगताप (शिवसेना, उबाठा), प्रज्ञा खांबे (अपक्ष)

जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघात नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरु असून दि.२९ ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे. या सर्व अर्जाची दि. ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार असून दि.४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येणार आहे. मतदान दि.२० नोव्हेंबरला होत असून दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

💥पोटे मसाले तर्फे दिवाळीच्या शुभेच्छा

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!