पनवेल दि.२७: उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चा तर्फे पूजा चव्हाणला न्याय मिळावा या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात, आज कळंबोली मॅकडोनाल्ड जवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आले. पूजाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेले मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पूजाला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
पूजाच्या चव्हाणच्या मृत्यूला अनेक दिवस उलटून गेले तरीही तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही. न्यायाची मागणी करणार्यांवर कारवाई केली जाते आणि गंभीर आरोप असणारे मात्र मोकाट फिरत आहेत. या प्रकरणात मृत्यूची चौकशी करण्यात यावी या मागणी साठी भाजप महिला मोर्चावतीने राज्यव्यापी आदोलन शनिवारी करण्यात आले. त्याअंतर्गत भाजप उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा आश्विनीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली येथे महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करुन पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप असणार्या मंत्र्याने राजीनामा दिला पाहिजे तसचे या मृत्यूची चौकशी कुटूंबीयांना न्याय मिळवूण देण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेविका प्रमिला पाटील, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, रुचीता लोंढे, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, कळंबोली शहर अध्यक्षा मनिषा निकम, सुहासिनी केकाणे, माजी नगरसेविका नीता माळी, ज्योती देशमाने, संध्या शारबिद्रे, प्रियंका पवार, राखी पिंपळे, मनिषा बहिरा, स्वाती केंद्रे, खोपोली शहर अध्यक्षा शोभा कांडे, माजी नगरसेविका अनिता शहा, सुमिता महिर्षी, जयश्री धापटे, वैषाली पाटील, दुर्गा सहाणी, अश्विनी अत्रे, मनिषा पाटील, वृषाली पाटील, सरिता बसनो, आशा देवी मल्हार, पुजा पाटील, भागमुणी शहा, निता अधिकारी, लैला शेख, हर्षदा तुपे, ललीता नारायण, सोनाली सावंत, सोनाली घरटमोल, साधना आचार्य, यमुना प्रकाशन, श्रषीता देवरुखकर, वैशाली पाटील, आशा मुंढे, यांच्यासह सर्व महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि सर्व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या आंदोलनामध्ये कळंबोली येथे महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.मार खावा लागला तरी आम्ही हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून आल्याने यावेळी कळंबोली पोलिसांनी महापौर चौतमोल यांच्यासह 40 आंदोलकांना ताब्यात घेतले. व नंतर त्यांची सुटका केली.
