उरण दि २७ (विठ्ठल ममताबादे) उरण परीसरातील छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करणारी एकमेव संस्था छावा प्रतीष्ठान गेले सात वर्ष चिरनेर मधील पठारावर वृक्षारोपण करुन त्यांचे संवर्धन करत आहेत.आत्तापर्यंत या पठारावर त्यांनी 200 कडूनिंबाची झाडेही जगवीली आहेत.तर गेले दोन वर्ष त्यांनी करंज,वड, मोहाची झाड लावली आहेत.हि झाडे जगवीण्यासाठी छावा प्रतीष्ठानचे सदस्य खूप मेहनत घेत आसून प्रत्येक झाडाला जगवीण्यासाठी पाण्याची सलाईन लावली आहे.
या पठारावर नुसते चढतानाही दम लागतो. परंतू छावा प्रतीष्ठानचे सदस्य पठाराच्या पायथ्यापासून 300 मिटर उंचावर 20 लिटरचे पाण्याचे ड्रम घेवून डोंगरावर चढतात.व ते पाणी प्रत्येक झाडाजवळ काठीच्या आधाराने लावलेल्या पाण्याच्या बाॅटल मध्ये टाकतात.सध्या ही 90 झाडे जगवीण्यासाठी हे सदस्य तन मन धन खर्ची घालीत आहेत.लाॅकडाऊनच्या काळातही या सदस्यांनी झाडांचे संवर्धन केल आहे.त्यामूळे बोडका होत चाललेला हा डोंगर बहरु लागला आहे.
या झाडांना जगवीण्यासाठी प्रामूख्याने छावा प्रतीष्ठानचे किरण म्हात्रे सर, उपाध्यक्ष सुशिल म्हात्रे, सदस्य संकेत म्हात्रे,खजीनदार सचिन केणी ,सचिव धिरज केणी,यांनी पुढाकार घेतला आहे.
कशी काम करते पाण्याची सलाईन……..
पिण्याच्या पाण्याची रिकामी बाॅटल पाण्याने भरली जाते त्या बाॅटलच्या बुंध्याला दाभणाने हवा आत जाण्यासाठी होल पाडला जातो किंवा कापतात.नंतर त्या बाटलीचा झाकण अशा प्रकारे सेट केला जातो की बाॅटल उलटी केली की झाकणामधून थेंबथेंब पाणी पडेल.नंतर ती बाॅटल झाडाच्या बुंध्याजवळ उभी केलेल्या काठीला आडकवतात. ह्या बाॅटल मधील पाणी चार तास पुरतो. त्यामूळे पाण्याची बचत होते व झाडालाही जास्त काळ पाणी पुरते.
चिरनेर मध्ये उंचावर आसणारा पठार नावाने प्रसिद्ध आसा वनखात्याच्या मालकीचा डोंगर आहे.या पठाराची उंची एवढी आहे.कि तेथून संपूर्ण उरण दृष्ठीक्षेपात येतो .या डोंगरावर गेले पाच वर्ष छावा प्रतीष्ठानचे मावळे गेले पाच वर्ष सिड बाॅल व रोप लावून वृक्षसंवर्धन करत आहेत.त्याचा परीणाम आज या डोंगरावर दोनशेच्या वर कडूनींबाची झाडे जगली आहेत. यावर्षी छावा प्रतिष्ठानचे महीला,पुरूष,तरूण,तरुणी,लहान मुल,मुली आसे चाळीस मावळे मिळून नव्वद झाडांची लागवड केली.यात उन्हाळ्यातही दाट व थंड सावली देणार्या करंजाची चाळीस झाड.तर जास्त आॅक्सीजन देणारी पन्नास वडाची झाड लावण्यात आली. त्यामूळे येत्या काही वर्षात या पठाराची ओळखच बदलून वड निंब करंजाचे पठार आसे होवून जाईल. या वृक्षारोपणासाठी येवढ्या उंचावर सत्तर वर्षांच्या गंगाबाई भोईर व पाच वर्षांचे आक्षर कडू,ओम भोईर,सानवी कडू, आनन्या म्हात्रे ही सहभागी झाल्यामूळे त्यांचे कौतूक करण्यात आले. तर सारडे विकास मंचचे नागेद्र म्हात्रे,विठ्ठल ममताबादे उपस्थीत होते. छावा प्रतीष्ठानचे उपाध्यक्ष सुशिल म्हात्रे,सचिव धिरज केणी, कार्याध्यक्ष संतोष भोईर, खजिनदार सचिन केणी, सहसचिव रमेश कडू ,आतीश पाटील, शरद चिर्लेकर,ओमकार म्हात्रे, शैलेश चिर्लेकर,आदिं छावा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.