पनवेल दि.११ (संजय कदम) : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘गो ग्रीन’ संस्थेच्या पुढाकारातून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ‘बॉटल बिन’ची स्थापना करण्यात आली आहे. गो ग्रीन संस्थेचे संस्थापक भरत सोनी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या बिनच्या माध्यमातून प्लास्टिक कचरा व बाटल्या एकत्र करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यास मदत होणार असून प्लास्टिक प्रदूषण रोखण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे.
भारतामध्ये वाढत चाललेल्या प्लास्टिक प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ‘गो ग्रीन’ संस्थेने पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत ‘बॉटल बिन’ हा अभिनव कचरा व्यवस्थापन बिन सादर केला आहे. हा बिन विशेषतः प्लास्टिक कचरा गोळा करणे, त्याचे विलगीकरण करणे आणि पुनर्वापरासाठी पाठवणे यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. ‘बॉटल बिन’ सार्वजनिक उद्याने, सरकारी आणि शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, आरोग्य केंद्रे, समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे, पेट्रोल पंप, ग्रामपंचायती तसेच रेल्वे आणि बस स्थानकांसारख्या ठिकाणी बसविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होण्यासोबतच प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन होण्यास चालना मिळणार आहे. परिसरातील नागरिकांनी प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर टाळावे तसेच बाटल्या एकत्र करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी याची मदत घ्यावी असे आवाहन वपोनि गजानन घाडगे यांनी केले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!