पनवेल, दि.28 (संजय कदम) ः कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सतर्कतेच्या भूमिकेतून पनवेल शहर पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी पायी गस्त घालत अनेक बेकायदा व्यवसाय करणार्‍यांची झाडाझडती घेतली.
पनवेलमध्ये मुख्य बाजारपेठ, जवेरी बाजार, वडाळे तलाव या ठिकाणी पाकीटमारी, फसवणुकीचे प्रकार किंवा वडाळे तलाव येथे बाईक रेसिंग आदी प्र्रकार घडत असतात. याच्या अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात येताच त्याच पार्श्‍वभूमीवर या विकृतीकरणाला व गुन्हेगारांना आळा घालून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे हे अधिक सतर्क असून त्यांनी आज सायंकाळी पनवेल शहरातील महत्वाच्या बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी इतर अधिकारी व कर्मचार्‍यांच्या साथीने पायी गस्त घालत रस्त्यावर बेकायदेशीर व्यवसाय करणारे परप्रांतीय, वाहतूक कोंडी करणारे वाहन चालक आदींच्या संदर्भात त्यांनी लक्ष घालून काहींवर कारवाई करून आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेलकरांनी कोणतीही भिती न बाळगावी. पोलीस आपल्या सदैव रक्षणासाठी तत्पर असल्याचे तसेच कोणताही अनुचित प्रकार किंवा घटना घडल्यास त्यांनी त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सुद्धा पायी गस्तीच्या माध्यमातून वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे.

♦️”गावसकर, सचिन, विराट आणि पुढचा कोण तर तो पनवेलमधून खेळाडू असेल” – दिलीप वेंगसरकर
🛑चिरनेर येथील प्राथमिक आश्रम शाळेतील योग वर्गाची सांगता !
🛑शेकापचे प्रभुदास भोईर, काँग्रेसचे कृष्णा पारंगे अनेक समर्थकांसह भाजपात दाखल !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!