महेंद्रशेठ घरत यांच्या दातृत्वाचे गणेश नाईक यांनी केले कौतुक
उलवे, ता. २९ : राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी फ्लेमिंगोंचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून नवी मुंबईतील पाणथळ जागा आरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला आहे. त्याबद्दल आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे ‘व्हाईट हाऊस’ येथे जाऊन अभिनंदन केले. यावेळी फ्लेमिंगोंच्या नयनरम्य छायाचित्राची फोटोफ्रेम गणेश नाईक यांना महेंद्रशेठ घरत यांनी भेट म्हणून दिली. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “नाईक साहेब, आपण फ्लेमिंगोंना वाचविण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. फ्लेमिंगोंमुळे नवी मुंबईला एक वेगळी ओळख मिळाली आहे. वनमंत्री म्हणून आपला हा निर्णय कायम स्मरणात राहील, त्यामुळे आपले अभिनंदन करणे माझे कर्तव्य आहे. आपण यापुढील काळातही भूमिपुत्रांच्या आणि निसर्गाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहाल, अशी आम्हाला आशा आहे. अभिनंदन गणेश नाईक साहेब!”
यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी महेंद्रशेठ घरत आणि त्यांच्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, महेंद्र तू तुझे शेलघर गाव मस्त विकसित केलेस, बंगल्यांचे गाव म्हणून आज प्रसिद्ध होत आहे. तुझे सामाजिक कामही उत्तम सुरू आहे, अनेकांना करत असलेली सढळ हस्ते मदत अभिमानास्पद आहे, हे सर्वांना नाही जमत, पण तू छान करतोस सर्वकाही.”
यावेळी व्यावसायिक सुनील घरत, मनोज फडकर, मुरलीधर ठाकूर, शुभम घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

🛑Orion Mall’s 9th Anniversary
🔸”जागा कमी पडत असल्याने मॉलचा लवकरच विस्तार” – मंगेश परुळेकर

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!