पनवेल दि.२७: आजचे युग हे विज्ञानाचे आणि स्पर्धेचे युग आहे. मानवाच्या वाढत असलेल्या भौतिक गरजा त्यातून निर्माण झालेली हव्यासी जीवनशैली याचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. मानवास अस्तित्व टिकवण्यासाठीतंदुरुस्त राहणे गरजेचे आहे.योग साधनेच्या माध्यमातून शारीरिक घटकांचा विकास होतोच मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार त्यांच्या सहभागाचे उद्दिष्टे वेगवेगळे असतात. काही व्यक्ती आपले कार्यमान उंचविण्यासाठी तर काही आपल्या शारीरिक सुदृढतेच्या घटकांचा विकास व्हावा म्हणूनही साधना अंगीकृत करतात. योग साधनेचे अनेक फायदे आहेत योग केल्याने शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्य उंचावते. शरीर निरोगी राहते. तणाव कमी होतो, मानसिक संतुलन सुधारते. प्राचीन भारतात उगम पावलेले हे एक अध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र आहे. ते पूर्ण विज्ञान आहे चिकित्सा एक पूर्ण जीवनशैली आहे. ही एक पूर्ण चिकित्सा पद्धती देखील आहे. योगाच्या लोकप्रियतेचे रहस्य हे आहे की लिंग,जाती, वर्ग,संप्रदाय, क्षेत्र आणि भाषा भेदाच्या पलीकडचे आहे. व्यक्तीच्या निर्माणात आणि उत्थानामध्येच नाही तर परिवार, समाज, राष्ट्र आणि विश्वाच्या चौमुख्य विकासामध्ये ही योगाचा उपयोग सिद्ध झाला आहे.आजच्या धकाधकीच्या काळात शारीरिक आरोग्य व मानसिक शांती मिळविणे खूप गरजेचे बनलेले आहे. प्राचीन भारतात उगम पावलेला योग शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक विकासाची एक समग्र प्रणाली म्हणून विकसित झाला आहे. पाणिनी यांनी योग या शब्दाचा “संयोग, संयमन व समाधी”असे तीन अर्थ सांगितलेले आहेत. महर्षी व्यास यांनी योगाचा अर्थ ‘समाधी’ असा सांगितलेला आहे. पूर्वीपासून स्त्रियांचा योग, खेळ, शारीरिक उपक्रम, यातील सहभागाचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, शरीरिक उपक्रम म्हणून योगसाधनेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधने लाभली होती. आजही शारीरिक उपक्रम योग यामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आवश्यक बदल हे खूपच कमी प्रमाणात झालेले आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींची शारीरिक सुदृढता ही कमी असते. मुलीसुद्धा विविध खेळ योगाच्या माध्यमातून आपली शारीरिक सुदृढता वाढवू शकतात.त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी योग अतिशय उपयुक्तता लक्षात घेऊन उरण तालुक्यातील चिरनेर प्राथमिक आश्रम शाळेत मागील आठ महिन्यापासून सुरु असलेल्या योग वर्गाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला.
योग केवळ पुस्तकात वाचण्यासाठी न राहता तो विद्यार्थ्यांच्या रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा म्हणून योग शिक्षक विजय पवार यांनी मुख्याध्यापक श्री मोरे सर यांच्या सहयोगाने मागील आठ महिन्यापासून योगासन वर्ग सुरू केला . पहाटे सहा वाजता सुरू होणाऱ्या या योग वर्गात इयत्ता चौथी ते सातवीचे २१ विद्यार्थ्यांना योगासन, ध्यानधारणा शिकत होते. उभ्याने केली आजाणारी आसने, बसून व झोपून केल्या जाणाऱ्या आसनांबरोबर शीर्षासना सारखे अवघड आसन देखील या योगवर्गातून विध्यार्थ्यांना शिकवण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आणि शारीरिक बदल घडून आल्याचे दिसून आले.
मागील आठ महिने अविरत सुरू असलेल्या योगवर्गाचा सांगता समारंभ बुधवारी २३ एप्रिल रोजी पार पाडला. यावेळी तेरणा पद्मयोग साधना कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सुषमा काळे, सुरेश काळे, चिरनेर मधील प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र खारपाटील, रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष अनिल भोळे, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेगडे व पत्रकार उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी करून दाखविलेली आसनांच्या प्रात्यक्षिकांनी त्यांच्या मागील आठ महिन्याचा योगसाधनेचा अभ्यास पाहुण सर्व मान्यवरानी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे औचत्य साधून पनवेल प्रेस क्लब तर्फे योगार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप व तेरणा पदमयोग साधना कॉलेज च्या. वतीने टी शर्ट वाटप करण्यात आले.

🛑”पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील” – आशीष शेलार

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!