पनवेल दि.२६: अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय मायबोली एकपात्री अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय ०७ हजार, तृतीय क्रमांकास ०३ हजार रुपये, उतेजनार्थ एकूण ०२ पारितोषिके तर रायगड जिल्हास्तरीय अभिनय स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ०५ हजार, द्वितीय ०३ हजार तर तृतीय क्रमांकास ०२ हजार रुपये, उतेजनार्थ एकूण ०२ पारितोषिके असणार आहेत.
मराठी भाषेत हि स्पर्धा होणार असून १५ वर्षांवरील स्पर्धकाला या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार असून प्राथमिक फेरी ऑनलाईन तर अंतिम फेरी ऑफलाईन स्वरुपात पनवेलमध्ये होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑडिशनचे व्हिडीओ ०७ सप्टेंबर २०२१ पर्यंत natyaparishad.panvel@gmail.com या ईमेल पाठवावे. अधिक माहितीसाठी अमोल खेर(९८२०२३३३४९), किंवा गणेश जगताप (९८७०११६९६४) यांच्याशी संपर्क साधावा.स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष असून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!