पनवेल दि.२५: राजकारणाचा आधार घेऊन गांधी परिवाराचे नाव प्रकल्पांना देतात. मात्र ज्यांनी गरिबांसाठी संघर्ष केला, भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला अशा थोर संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास महाराष्ट्र सरकार का विरोध करत आहे हे ठाकरे सरकारने जाहीर करावे, असे आव्हान राज्याचे माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला आज येथे दिले.
ओवळे विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तसेच २७ गाव समिती कार्याध्यक्ष सुनिलशेठ म्हात्रे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह महिला मंडळ, ज्येष्ठ, महिला, युवक शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा राज्याचे माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, ज्येष्ठ नेते के. ए. म्हात्रे, सुभाष म्हात्रे, कर्णा शेलार, तालुका चिटणीस प्रल्हाद म्हात्रे, सुनिल पाटील, तुळशीराम घरत, विश्वनाथ घरत, संदीप घरत, रमेश पाटील, राकेश गायकवाड, आदी उपस्थित होते.
आमदार आशिष शेलार यांनी पुढे बोलताना, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी दि. बा. पाटील यांनी आपले आयुष्य वेचले, अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागलेच पाहिजे असे सांगतानाच यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याचे त्यांनी कौतुक करत हा मतांचा संघर्ष नाही तर भूमिपुत्रांच्या अस्मितेसाठी संघर्ष असून दिबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे आणि त्यासाठी तसूभर मागे हटणार नाही, असा स्पष्ट ईशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. सिडकोचे अध्यक्ष असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील समस्या, नागरिकांचे प्रश्न, भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कुठल्याही दलालाला तिथे थारा नव्हता. पण आता विमानतळाचे काम सुरु असताना या कामाचे टेंडर मुंबईतील निर्मल इमारतीत ठरते आणि दलाली ठरल्यानंतर वैभव चेंबरमध्ये कन्फर्मेशन ऑर्डर निघते असा राज्य सरकारचा कारभार सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाचा गौरवदिन असलेला स्वातंत्र्य दिन देशातील प्रत्येक नागरिकाला ज्ञात आहे मात्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हीरक कि अमृतमहोत्सव माहीत नाही याची त्यांना लाज वाटली पाहिजे असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी मोठी चूक करायची आणि या संदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली यात नामदार नारायण राणे यांचा गुन्हा काय आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी हे पक्ष घराणेशाहीवर चालणारे पक्ष आहे तर भाजपा लोकशाहीच्या मूल्यांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे चहा विकणाऱ्या कुटुंबातील सामान्य व्यक्ती देशाचे पंतप्रधान झाले आहेत. या पक्षात सामान्य कार्यकर्त्यालाही संधी मिळते, त्यामुळे सुनिल म्हात्रे, गजानन म्हात्रे व सहकाऱ्यांना येथे मोठी संधी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कधी काळी शेकाप शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत होता आता तो पण उरला असेही त्यांनी म्हटले.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत असून या पक्षात सर्व कार्यकर्त्यांना मान सन्मान आणि काम करण्याची संधी मिळते. आज आम्ही ७० व्या वर्षीही राजकारण समाजसेवा करीत आहे त्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद मिळत आहे आणि त्यातून आम्हाला कार्य करण्याची ऊर्जा मिळते. दिबासाहेबांच्या नावासाठी सर्वपक्षीय लढा उभारला. लढ्याला मोठे यश आले मात्र समिती रामशेठ ठाकूर यांनी हायजॅक केली असा आरोप शेकाप करतो समितीत बाळाराम पाटील यांना कार्याध्यक्ष पद होते मग त्यांनी का काम केले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेकापला पनवेल उरण मधून हद्दपार केले. पूर्वी शेकापला शेपूट कापलेला पक्ष त्यानंतर डबके बोलायचे मात्र आता ते डबके पण राहिले नाही, अशा शब्दात त्यांनी खरपूस समाचार घेतला. आमदार महेश बालदी गुपचूप काही करत नाही चॅलेंज देऊन करतात त्यामुळे किमान पुढील पाच निवडणुका ते जिंकणार असे सूतोवाच करताना आमदार महेश बालदी भाजपचा वजनदार नेता असल्याचे सांगताना त्यांच्याप्रती अभिमान व्यक्त केला.
आमदार महेश बालदी यांनी बोलताना सांगितले कि, विमानतळाला दिबासाहेबांचे नाव लावण्यास शेकापने विरोध केला. त्यावेळी सुनिल म्हात्रे व सहकाऱ्यांनी त्या विरोधात चीड निर्माण केली आणि तेथून हे पक्ष परिवर्तन घडले. दिबांसाहेबांच्या नावासाठी भूमिपुत्र पेटून उठला मात्र शेकापवाले किंतु परंतु करत ठाकरे सरकारच्या दावणीला बांधून राहिले. माझ्या वडिलांचे नाव प्रकल्पाला लागले पाहिजे हे कुठल्याच मुख्यमंत्र्याने हट्ट केला नाही मात्र या ठिकाणी करून भूमिपुत्रांच्या भावना संतप्त करण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे. ५२० कोटी रुपयांचा कर्नाळा घोटाळा करूनही शेकापचे नेते उजळ माथ्याने फिरतात कारण छळ कपट करून आलेले राज्य सरकार घोटाळ्याबाजांना पाठीशी घालत आहे. उरण नगरपालिकेत शेकाप शून्य आहे मात्र नगरपालिका जिंकणार असल्याचा कांगावा करत स्वतःची किमंत करून घेत आहे. स्वबळावर यांची काहीच ताकद नाही त्यामुळे इतर पक्षाची कुबडी घेऊनच शेकाप तग लावण्याचा प्रयत्न करतोय, अशी टीकाही आमदार महेश बालदी यांनी शेकापवर केली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!