पनवेल दि.२२: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी राजभाषा दिन यांच्या औचित्याने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हा तर्फे आयोजित व स्वररंग, डोंबिवली प्रस्तुत ‘माय बोली साजिरी मराठी मनाचा कॅनवास’ या संस्कृती वृद्धिंगत करणाऱ्या कार्यक्रमाचे रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५. ३० वाजता शहरातील गोखले सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.
या सांस्कृतिक कार्यक्रमात अभंग, ओव्या, कविता, म्हणी, उखाणे, गाणी, संत साहित्य, खाद्य संस्कृती, पेहेराव संस्कृती, शस्त्रास्त्र संस्कृती या सर्वांचा अभिवाचनात्मक आविष्कार असून या कार्यक्रमात लेखक, दिग्दर्शक, संकल्पना, निर्मिती मेघा विश्वास, कलाकार समीर सुमन, तपस्या नेवे, अमेय रानडे, मेघा विश्वास तर साईड रिदम रुपेश गांधी यांचा सहभाग आहे. आजच्या मॉडर्न पिढीसाठी आणि त्यांच्यावर माय मराठी अर्थात माझ्या मराठीचे संस्कार करणाऱ्या आधीच्या पिढीसाठीही हा कार्यक्रम पर्वणी आहे. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिकेसाठी ९०२९५८०३४३ किंवा ९८७०११६९६४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!