पनवेल,दि.22 : बालकांचे आरोग्य सदृढ रहावे यासाठी शासनाच्यावतीने जागरूक पालक तर सुदृढ बालक अभियान 9 फेब्रुवारीपासून राज्यभरात सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेने आतापर्यंत 25 हजार 770 बालकांची आरोग्य तपासणी केली आहे. यामुळे बालकांमधील आजारांचे वेळीच निदान होऊन उपचार करण्यास मदत होत आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जागृत पालक सुदृढ बालक अभियान राबविण्यात येत आहे. दोन महिने राबविण्यात येणाऱ्या या अभियानासाठी पालिकेच्यावतीने 20 आरोग्य पथके तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये महापालिकेच्या परिचारिका, एमजीएम महाविद्यालयाकडून डॉक्टर्स, नर्सेस तसेच राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्याची दोन पथके, सामुदायिक आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत महापालिका क्षेत्रातील बालकांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्ष वयोगटातील अंगणवाडी, बालवाडी व खाजगी नर्सरीतील बालके, ६ ते १८ वर्ष वयोगटातील शासकीय, खाजगी शाळा, अनुदानित शाळा दिव्यांग शाळा व आश्रमशाळेतील,महाविद्यालयातील विद्यार्थाची तसेच शाळा बाह्य मुले अशी एकुण दीड लाख मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. याकामामध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल महापालिकेस सहकार्य करत आहे. पनवेल शहरामधील केव्ही कन्या प्रशाला आणि व्ही.के हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठीकरिता त्यांनी सहकार्य केले आहे.
आत्तापर्यंत तपासणी झालेल्या 25 हजार 770 बालकांपैकी 1 हजार465 बालके संदर्भित करण्यात आले आहेत. यापैकी 5 बालके शस्त्रक्रियेकरिता पुढे संदर्भित करण्यात आले आहेत.
आरोग्य तपासणी तपशील:
0-18 वर्षे वयोगटातील एकुण 25 हजार 770 मुलांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
0-6 वर्षे – 3 हजार 33 1 मुले तपासणी पूर्ण
6-10 वर्षे – 6 हजार 967 विद्यार्थी तपासणी पूर्ण
10-18 वर्षे – 15 हजार 320 विद्यार्थी तपासणी पूर्ण

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!