मुंबई दि.14: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रिमझिम सुरू आहे.
मुंबई, ठाणे, नवी, मुंबई, पालघर, रायगड जिल्ह्यात मागील 3-4 तासात चांगलाच पाऊस झाला. सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यामुळे वातवारण थंड झालं आहे.
काल मध्यरात्रीपासून मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात हलक्या -ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. एकाएकी थंडीत सुरु झालेल्या रिमझिम पावसाने मुंबईकरांची धांदल उडाली.
त्यामुळं आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच गोची झाली.
दरम्यान मुंबईसह उत्तर कोकणात पावसाचा हा जोर पुढील काही तास कायम राहणार असून अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.