Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps
पनवेल दि.३०: या एसी लोकलचे खास महत्व म्हणजे याचे सारथ्य महिला मोटर वूमन मनीषा मस्के यांनी केले. यामुळे मस्के या भारतामधील एसी लोकल चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. एसी लोकलचे वैशिष्ट म्हणजे याचे दरवाजे ऑटोमेटिकली लॉक-अनलॉक होणारे आहेत. ही लोकल पनवेल ते ठाणे आणि पनवेल ते वाशी दरम्यान धावणार असून एकूण 16 फेऱ्या दिवसभरात होणार आहेत. तर सामान्य लोकलच्या 15 फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. एसी लोकलचे तिकीट ठाणे-वाशी मार्गासाठी सुमारे 130 रुपये आणि ठाणे-पनवेल मार्गासाठी सुमारे 175 रुपये असेल, आज ठाणे ते पनवेल अशी उदघाटनाची लोकल चावलण्यात आली आणि उद्या म्हणजे 31 जानेवारी पासून या लोकलच्या नियमित फेऱ्या सुरु होणार आहेत.