लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने अधिक जोमाने काम करू – आकाश चौधरी !
पनवेल दि.२: शिवसेनेतून भाजपात प्रवेश करून सेनेला जोरदार धक्का देणाऱ्या माथेरानच्या टीमने आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट व आशिर्वाद घेतले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेत असताना त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या आशिर्वादातून आम्हाला विधायक कामे करण्याची ऊर्जा मिळाली आहे. त्यांच्या आशीर्वादाने अधिक जोमाने काम करू. असे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले.

   माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव या १० नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे १४ पैकी १० नगरसेवकांनी केलेल्या या प्रवेशामुळे शिवसेना मोठा झटका बसला आणि त्या अनुषंगाने हा राज्यात चर्चेचा विषय बनला. भाजपात प्रवेश केलेले उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आणि भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष मंगेश म्हस्कर, युवा नेते किरण ठाकरे, ज्येष्ठ नेते प्रविण सकपाळ, प्रदिप घावरे, कुलदिप जाधव, किरण चौधरी, राजेश चौधरी, सचिन दाभेकर, लक्ष्मी चौधरी, गिता जाधव, पुनम सकपाळ, भरती चौधरी, शितल चौधरी आदी माथेरानच्या टीमने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबरच आजच्या या शुभदिनापासून आम्ही अधिक जोमाने काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख उपस्थित होते. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!