मुंबई, ता. 21 : “गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे, रायगड काँग्रेसला नवसंजिवनी देणारे, काँग्रेस पक्षाचा एक आधार
महेंद्रशेठ घरत यांचा आज मुंबई सेंट्रल येथे काँग्रेसचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या कार्याबद्दल सपकाळ यांनी गौरोदगार काढले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अशा लढाऊ नेत्याच्या खंबीरपणे पाठिशी उभी राहणार, असे सुतोवाच केले.
यावेळी महेंद्रशेठ घरत हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, “गांधींचे विचार आपण विसरलोय, मी विचारांशी बांधिलकी जपलीय, मी लोकांच्या सेवेत वाहून घेतले आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ देतोय. काँग्रेसला राहुल गांधींच्या विचारांचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या रूपाने प्रदेशाध्यक्ष लाभलेत, त्यामुळे येणारा काळ काँग्रेसचाच असेल.”
मुंबईतील बीआयटी चाळ येथील मैदानात रक्तदान शिबिर आज झाले. त्यावेळी महाराष्ट्र एस. टी. काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांच्या पुढाकाराने झालेल्या रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे दानशूर व्यक्तिमत्त्व असून काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत, असे एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यावेळी म्हणाले.
यावेळी अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप, आदी मान्यवर उपस्थित होते.