रायगड दि.0९: फेब्रुवारी–मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या इयत्ता 12 वी व 10 वीच्या सार्वजनिक परीक्षांचा गैरप्रकारमुक्त व शांततेत कारभार पार पडावा यासाठी रायगड जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये (नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्र वगळून) हा मनाई आदेश जारी केला आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा दि.10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत, तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षा दि. 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहेत. या परीक्षांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व परीक्षा वितरण केंद्रे व परीक्षा केंद्रांवर संबंधित निर्बंध लागू राहणार आहेत.
या मनाई आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात मोबाईल फोन, पेजर वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येक पेपरच्या 24 तास आधीपासून परीक्षा केंद्रांच्या 50 मीटर परिसरातील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच प्रत्येक पेपरच्या एक तास आधीपासून ते पेपर संपल्यानंतर एक तासापर्यंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षार्थी विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या 50 मीटर परिसरात फिरण्यास मनाई राहणार आहे. परीक्षेसाठी आवश्यक साहित्याव्यतिरिक्त कोणतेही आक्षेपार्ह साहित्य वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई व शिक्षा करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133