उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे) उरण मध्ये ४ जिल्हा परिषद व ८ पंचायत समिती सदस्य पदासाठी निवडणूक झाली असून ४ जिल्हा परिषद पैकी ३ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. तर ८ पंचायत समिती सदस्य पदा पैकी ७ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती अशा मिळून १२ जागापैकी १० जागेवर महाविकास आघाडी निवडून आली आहे. भारतीय जनता पार्टीचा १ जिल्हा परिषद सदस्य व १ पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. या निकालामूळे भारतीय जनता पार्टीला खूप मोठा धक्का बसला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या घटक पक्षाचे मिळून उरण मध्ये महाविकास आघाडी तयार करण्यात आली. भाजपला प्रत्यूतर देण्यासाठी महाविकास आघाडी तयार करून नियोजन बद्ध प्रचार करण्यात आला त्यामुळे उरण मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागेवर विजय मिळविता आला आहे. या निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाला आहे. मतदारांनी महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत दिले असून भाजप ला स्पष्ट पणे नाकारले आहे. या निवडणुकीमुळे भाजपला आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उरण तालुक्यात सुरवातीपासूनच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा अटी तटीचा सामना रंगला होता. उरण तालुक्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र असल्यामुळे हेच चित्र निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून दिसून आले. उरण मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वाधिक मताने निवडून आले असून त्या नंतर भाजपच्या उमेदवारांचा नंबर लागतो.आमदारकीच्या निवडणुकीत आ. महेश बालदी यांना चांगली मते मिळाली असल्यामुळे तीच मते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मिळतील असा विश्वास भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना होता. मात्र मतदारांनी तो अंदाज खोटा ठरविला. उरण मध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून या निकाला वरून २०२९ चा आमदारकीचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असेल अश्या आशा भावना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या.
उमेदवारांची नावे व त्यांना मिळालेली मते:-
चिरनेर जिल्हा परिषद
ऍड अविनाश विजय ठाकूर (महाविकास आघाडी ) 14932
देवेंद्र विनायक पाटील (भाजप ) 11169
संतोष श्याम गावंड (अपक्ष ) 156
अविनाश जयवंत पाटील (अपक्ष ) 104
रत्नाकर हरिश्चंद्र म्हात्रे (अपक्ष ) 88
NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा) 354.
विजयी उमेदवार – ऍड अविनाश ठाकूर
नवघर जिल्हा परिषद
प्रेरणा कुणाल पाटील (महाविकास आघाडी )10617
प्रभावती राजाराम भोईर (भाजप )6198
सोनाली तुषार गायकवाड (वंचित बहुजन आघाडी ) 173
NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा) 449
विजयी उमेदवार – प्रेरणा कुणाल पाटील
जासई जिल्हा परिषद
जे डी जोशी (भाजप ):- 8811
डॉ मनिष पाटील (महाविकास आघाडी )10803
संतोष दत्तू भालेकर (अपक्ष )154
NOTA (वरील पैकी एकही नाही (नोटा) 309
विजयी उमेदवार – डॉ मनिष पाटील
चाणजे जिल्हा परिषद
सिद्धी सागर कडू (महाविकास आघाडी) – 8437
रीना जितेंद्र घरत (भाजप )10069
मालती संतोष भगत (आम आदमी पार्टी ) 273
NOTA (वरील पैकी एकही नाही ) (नोटा ) 482
विजयी उमेदवार – रीना जितेंद्र घरत
नवघर पंचायत समिती
परेश धनाजी ठाकूर (महाविकास आघाडी )- 4341
ऍड. रजनीकांत गणेश पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) 346
हरेश गंगाधर भोईर (भाजप) 3968
NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा ) 307
विजयी उमेदवार – परेश धनाजी ठाकूर
भेंडखळ पंचायत समिती
कुंदा भूषण पाटील( माकप)686
मिलिंद काशिनाथ पाटील (भाजप )3136
दिपक सुरेश भोईर (महाविकास आघाडी )4270
भावेश भारत भोईर(शिवसेना )167
शिवाजी यशवंत ठाकूर (अपक्ष )52
NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा ) 163
विजयी उमेदवार – दिपक सुरेश भोईर
जासई पंचायत समिती
मनीषा बळीराम घरत (भाजप )4035
निर्मला नरेश घरत (महाविकास आघाडी )4165
NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा)180
विजयी उमेदवार – निर्मला नरेश घरत
चिर्ले पंचायत समिती
ज्योस्त्ना अजित पाटील( भाजप) 5231
प्रियांका दिपक मढवी (महाविकास आघाडी )6241
NOTA वरील पैकी एकही नाही (नोटा )225
विजयी उमेदवार – प्रियांका दिपक मढवी
केगाव पंचायत समिती
परीक्षित प्रकाश ठाकूर( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )566
राजेंद्र आत्माराम ठाकूर (भाजप )3498
महेश महादेव म्हात्रे (महाविकास आघाडी )4035
NOTA (वरील पैकी एकही नाही (नोटा ) 154
विजयी उमेदवार – महेश महादेव म्हात्रे
चाणजे पंचायत समिती
कैलास मोरेश्वर भोईर (भाजप )4751
अक्षय महेश म्हात्रे (शिवसेना )1620
ऍड सागर सदानंद कडू(महाविकास आघाडी )- 4329
NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )308
विजयी उमेदवार – कैलास मोरेश्वर भोईर
चिरनेर पंचायत समिती
कविता रूपेश पाटील (महाविकास आघाडी )8247
साक्षी सुजित पाटील (भाजप) 5222
NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )284
विजयी उमेदवार – कविता रुपेश पाटील
आवरे पंचायत समिती
सुषमा चंद्रकांत गावंड (मनसे )1076
समिधा निलेश म्हात्रे (भाजप )4249
प्रारंभी अविनाश गावंड (महाविकास आघाडी )7414
NOTA (वरील पैकी एकही नाही )(नोटा )312
विजयी उमेदवार – प्रारंभी अविनाश गावंड
![]()
