कल्पतरू रिव्हरसाइड हाउसिंग सोसायटीचा उपक्रम
पनवेल दि.५: शाश्वत उर्जा पद्धतींसाठी एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून पनवेल मधील कल्पतरू रिव्हरसाइड हाउसिंग सोसायटीने सौर ऊर्जा प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचे उदघाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी त्यांनी हा उपक्रम पनवेलच्या ग्रीनर फ्युचरसाठी योगदान देणार असल्याचे प्रतिपादन केले.
कल्पतरू सोसायटीमध्ये बसवण्यात आलेली सौर उर्जा प्रणाली ही ३०० किलोवॅट क्षमतेची असून केवळ पनवेलमध्येच नाही तर संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात मोठी आहे. हा प्रकल्प डेट इंजिनीअरिंगने तीन महिन्यांच्या विक्रमी वेळेत अंदाजे एक कोटी वीस लाख रुपये खर्च करून पूर्ण केला आहे. हा प्रकल्प दरमहा अंदाजे ३६००० युनिट वीज निर्मितीसाठी सज्ज आहे. यामुळे वीज बिलांवर सुमारे ७० लाख रुपयांची वार्षिक बचत होणार आहे. या वेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, प्रशांत बाळाराम ठाकूर, गुडापती ब्रह्माजी, मिलिंद कुलकर्णी, संस्थेचे सचिव सतीश पिल्लई, विनीत मित्तल, सोसायटीचे खजिनदार समर चौहान, उद्योगपती मनोज आंग्रे, वैभव देशमुख, भार्गव ठाकूर, विजय रेखी, दिलीप घरत, रवि म्हात्रे, संदीप साळुंके, पूजा सिंग, साक्षी पत्की, जिंदा दिलचे अध्यक्ष नितीन मोरे यांच्यासह इतर व्यवस्थापकीय समिती सदस्य आणि कल्पतरू सोसायटीचे रहिवासी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!