पनवेल दि.१३: महिला भगिनी आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटत असतात. या बहिणींना ताकद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, मात्र ही योजना सुरू झाल्याने विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. ते ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. तरीही ही योजना बंद होणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठणकावून सांगितले.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे. याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेलमधील सर्व महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून बेलवलीमध्ये हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भष्टाचारी शेकापवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, तीन वर्ष झाली माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँकेत घोटाळा केल्याने जेलमध्ये आहे. लोकांचे पैसे खाऊन जे तुरुंगात आहेत त्यांच्याच पक्षाने लोक येऊन सांगतात लाडकी बहीण योजना बंद होईल. त्यामुळे खोटं पसरवणारे कोण आहेत हे नीट पाहून घ्या. देशातील सरकार हे महिलांसाठी विविध योजना आणत आहेत, तर राज्यामध्ये महायुतीचे सरकार महिलांच्या हितासाठी काम करत आहे. या सर्व कल्याणकारी योजना सुरू राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत यायला पाहिजे. यासाठी तुमचा आशीर्वाद महायुती सरकारच्या पाठिशी राहूद्या, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अमरीश मोकल, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पं.स. सदस्य निलेश पाटील, जिल्हा चिटणीस भूपेंद्र पाटील, युवा नेते योगेश लहाने, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष कमला देशेकर, सरचिटणीस प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य योगिता भगत, उपाध्यक्ष समिना साठी, कोषाध्यक्ष ज्योती भोपी, मनिषा बहिरा, माजी नगरसेविका निता माळी, पल्लवी पाटील, मित्तल पाटील, बेलवलीच्या उपसरपंच अप्रिता पवार, सदस्य सविता पाटील, रेश्मा माळी, पूजा पाटील, निता मंजुळे, शिल्पा पवार, संगीता भुतांबरा, सतिश पाटील, अप्पा भागीत, जितेंद्र बताले, संतोष पाटील, नारायण म्हात्रे, अनंता पवार, नासीर शेख, राम भवर, भालचंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑Navi Mumbai Airport Flight Testing
🔸नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान
🔹भारतीय वायुदलाच्या सी 295 विमानाचं यशस्वी लँडिंग
🛑CIDCO Exhibition & Convention Centre:
🔸मला लोकांच्या आड येणारे नियम नकोत – मुख्यमंत्री
🔹सिडकोच्या जमिनी आहेत त्या फ्री होल्ड करण्याचा निर्णय
♦️पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स वरील शास्ती माफ

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!