पनवेल दि.१०: पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळील गाढी नदीवर 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आज झाले. या पुलामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेले अनेक वर्ष विचुंबे येथे नवीन पूल उभारावा अशी मागणी होत होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी या कामाला मान्यता देत हा पूल पूर्णत्वास नेला. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवद, उसर्ली, शिवकर, मोहो पाली असा प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, या वेळी 10 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे उद्घाटन, तर एक कोटी रुपयांच्या निधीतून विचुंबे गावात अंतर्गत गल्लीचे काँक्रीटीकरण, 50 लाख रुपयांच्या निधीतून विचुंबे अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, विचुंबे बौद्धवाडा ते ग्रीन व्हॅलीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण आणि विचुंबे पोलीस चौकी ते सारनाथ बुद्धविहार ओमकार पार्कपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन झाले.
या सोहळ्यांना भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, उसर्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन भगत, अध्यक्ष के.सी. पाटील, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

🔸8 – श्रीदुर्गासप्तशती, भवानी अष्टकम,अन्नपूर्णा स्तोत्रम् पठण

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!