पनवेल दि.२६: महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून नुकताच घोषित झालेला गणेशोत्सव आजही सर्जनशीलता आणि सांस्कृतिक अभिमान यांचा प्रेरणास्त्रोत ठरत आहे. पर्यावरणपूरकतेचा संदेश लक्षात घेऊन केडी आर्ट्स अकॅडमी, पनवेल तर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी “वक्रतुंड पर्यावरणपूरक गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा” यंदा पाचव्या वर्षी उत्साहात पार पडली.
ही दोन दिवसीय कार्यशाळा २३ व २५ ऑगस्ट २०२५ रोजी काश्यप हॉल, लोकमान्य टिळक रोड, पनवेल येथे पार पडली. या उपक्रमात ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वयाच्या केवळ ३ वर्षांपासून २० वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आनंदाने व श्रद्धेने मूर्ती घडविणे व रंगविणे केले.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केडी आर्ट्स अकॅडमीचे संस्थापक व चित्रकार केविन डायस, तसेच फाईन आर्ट्सचे विद्यार्थी सागर जाधव, संध्या गुप्ता व यश पवार यांनी केले. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून सहस्रबुद्धे क्लासेसचे संचालक पुष्कर सहस्रबुद्धे उपस्थित होते. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांचे प्रायोजकत्व पॅन आर्ट कंपनी तर्फे करण्यात आले. पालकांनीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे वातावरण आणखीनच उत्साही झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन कार्यशाळेचा समारोप झाला. केडी आर्ट्स अकॅडमी दरवर्षी अशा उपक्रमांचे आयोजन करून कला, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम साधत आहे.

“केडी आर्ट्स अकॅडमीमध्ये आम्ही केवळ कला शिकवण्यावर भर देत नाही, तर संस्कार, संस्कृती आणि सर्जनशीलतेलाही प्रोत्साहन देतो. अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय सणांचे महत्त्व समजते आणि त्याचबरोबर कलेतून स्वतःची क्षमता उलगडण्याची संधी मिळते.” – केविन डायस

🔸पुरुष गटात सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ तर महिला गटात शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळ ठरले मानकरी !
🛑Panvel Cultural Centre:🔸पं. पलुस्कर यांना आदरांजली !
🛑ग्रामपंचायत भेंडखळ उपसरपंच पदी काँग्रेसचे अजित ठाकूर !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!