पनवेल दि.२६: आज भारतीय शास्त्रीय संगीत केवळ भारतातच नाही तर जगभर शिकलं, अभ्यासलं जात आहे. शंभर वर्षांपूर्वी ती केवळ मूठभर अभिजनांची मिरासदारी होती. राजदरबार आणि संस्थानिकांच्या महालातच शास्त्रीय संगीताचे सूर निनादत असत. ज्यांनी हे चित्र बदलण्यासाठी अपार कष्ट घेतले, त्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले आणि ध्यास घेऊन भारतीय शास्त्रीय संगीत घरोघरी पोहोचविले, त्या ऋषितुल्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या जन्मदिन (18 ऑगस्ट) आणि स्मृतिदिनानिमित्त (दि.21 ऑगस्ट) गेली अनेक वर्षे पनवेल कल्चरल सेंटर तर्फे सांगितिक मैफलीचे आयोजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात येते.
नुकताच हा कार्यक्रम पनवेल कल्चरल सेंटरच्या सभागृहात पार पडला. सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष मिलिंद गोखले, उपाध्यक्ष व संस्थेच्या संगीत विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार कर्वे आणि गायक चिन्मय लेले यांचे हस्ते पं.पलुस्कर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंदकुमार कर्वे यांनी पं.पलुस्करांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला आणि त्यानंतर चिन्मय लेले यांच्या गायनाला प्रारंभ झाला. चिन्मय लेले हे निषाद बाक्रे यांचे तयारीचे शिष्य असून त्यांनी मैफलीची सुरूवात पूरिया कल्याण रागातील ‘आज सो बना.. या तिलवाडा रागातील बडा ख्याल व त्याला जोडून ‘पिहरवा आजा आजा रे.. या त्रितालातील बंदिशीने केली. त्यालाच जोडून दृत एकतालातली एक बंदीश सादर केल्यावर राग मेघ मध्ये झपताल व त्रितालात दोन रचना गायल्या व नंतर पं. पलुस्करांचे गाजलेले ‘जब जानकीनाथ सहाय करे.. हे भजन गायले. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेल्या भैरवी रागातील अभंग गाऊन त्यांनी मैफलीची सांगता केली.
चिन्मय लेले यांना उचित अशी हार्मोनियम साथ नंदकुमार कर्वे यांनी तर तबला साथ मिलिंद मैसूर यांनी केली.

🔸पुरुष गटात सोमजाईदेवी प्रासादिक भजन मंडळ तर महिला गटात शिरसाई प्रासादिक महिला भजन मंडळ ठरले मानकरी !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!