ठाणे दि.१६: येत्या गुरूवारी 19 मार्च रोजी सकाळी 6:53 नंतर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले की या वर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सूर्योदयाला नसल्याने ‘क्षयतिथी’ आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 6:53 वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर नवीन वर्ष शालिवाहन शक 1948 पराभवनाम संवत्सर सुरू होत आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला जातो. संवत्सराचे नाव पराभव आहे. या नूतन वर्षात अनीतीने,असत्याने, दुष्टपणाने, स्वार्थीपणाने, भ्रष्टाचारीवृत्तीने वागणारांचा पराभव होणार आहे असा या नावाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. संवत्सरांची एकूण 60 नावे असून ती क्रमाक्रमाने येत असतात.
यापूर्वी 28 मार्च 2017 रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथी आल्याने अमावास्या तिथी समाप्तीनंतर गुढीपाडवा सण आला होता. आता यावर्षानंतर 10 एप्रिल 2032 रोजी अशी स्थिती येणार आहे असे दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!