रत्नागिरी दि.15(सुनिल नलावडे)- राजापूरची गंगामाई आज अकस्मात प्रकट झाली या वृत्ताने कोकण वासियांना गोड धक्का बसला अवघ्या नऊ महिन्यातच राजापूरच्या या तिर्थक्षेत्री झालेल्या आगमनाने तळकोकणातील भक्तजन आनंदले आहेत.
तिव्र उन्हाळा आणि पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत असताना निसर्ग चमत्कार राजापूरच्या या गंगेत वाहणारे पाणी आहे. मागिल काहि दिवसांपासून उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. अंग भाजणारा उष्मा व गेले दोन दिवस वाहणारे वादळी वारे पाऊस व सातत्याने ढगाळ वातावरण आणि उष्मा अशी विचित्र स्थिती कोकणात आहे. तर दुसरीकडे डोंगर माथ्यावर असलेल्या उन्हाळे गंगा तिर्थ क्षेत्री या गंगेचे आगमन झाले आहे. आज बुधवार सकाळी 6 वाजता राजापूरची ही गंगा प्रवाहीत झाली. गंगापुत्र श्रीकांत घुगरे यांनी हि माहिती दिली.
गतवर्षी 20 एप्रिल रोजी गंगेचे आगमन झाले होत. 62 दिवसांच्या वास्तव्या नंतर गंगा अंतर्धान पावली होती.
गंगेचे आगमनाचे वृत्त कळल्यानंतर राज्यभरासह ठिकठिकाणाहून भाविक गंगा स्नानासाठी येत असतात यावर्षी मात्र कोरोना संसर्गाचे सावट गंगा स्नानावर असून लॉकडावूनच्या निबर्धामुळे भाविकांना गंगा आगमनाच्या काळात स्नानाचा आनंद घेता येणार नाही. गंगा अवतरणाच्या काळात भाविकांना प्रथमच गंगा दर्शनाला अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
