रत्नागिरी दि.१४ (सुनील नलावडे) साखरतर येथील सहा महीन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. या बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधुन पाठवलेल्या करोना संर्दभातील १०० संशयीतातील या ऐका बाळाची करोना चाचणी पॉझीटीव्ह आल्याने साखरतर भागातील तीसरा करोना बाधीत रूग्ण आहे. त्यामूळे रत्नागिरी जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या सहा झाली असून चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हाधिकरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की 6 महिन्याचे बाळ साखरतर पॉझिटिव्ह महिलेचा नातेवाईक असून घाबरून जाण्याची गरज नाही. बाळाची प्रकृती ठीक आहे. बालरोगतज्ञ काळजी घेत आहेत. समुपदेशनासाठी काझी आणि त्यांची टीम तेथे कार्यरत आहेत.