रत्नागिरी दि.१३ (सुनील नलावडे) माकडाची शिकार करायच्या नादात त्याचा पाठलाग करणाऱया बिबटय़ाला व बिबट्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या माकडाने विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर उडी मारल्याने वीजेचा धक्का बसून माकड व बिबट्या मृत होण्याची घटना देवरुख आंबव येथे घडली आहे माकडाला पाहताच बिबट्याने पाठलाग सुरू केला आपला जीव वाचवण्यासाठी माकडाने थेट विजेच्या ट्रान्स्फॉर्मरवर उडी मारली परंतु विजेचा धक्का लागून माकड मृत झाले त्याचा पाठलाग करत आलेल्या बिबट्यानेही उडी मारल्याने त्याला विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने तोही मृत झाला.