रत्नागिरी दि.१७ (सुनिल नलावडे) संचारबंदी असूनही अनेक जण टुव्हिलर व अन्य वाहने घेऊन रस्त्यावर येत आहेत अशा नागरिकांना रोखण्यासाठी पोलीस नवे उपाय शोधून काढत आहेत आत्तापर्यंत वाहने जप्त करण्यापासून दंड करण्यापर्यंत तर कधी चाकातील हवा सोडण्याचा मार्गही पोलिसांनी अवलंबिला आज सकाळी सुद्धा उद्यमनगर रोडवर पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाई केली आज सायंकाळी मात्र पोलिसांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांसाठी नवीन फंडा काढला. बाहेर पडलेल्या वाहनधारकांना मारुती मंदिर येथे अडवण्यात येऊन त्याठिकाणी एक सेल्फी पॉइंट करण्यात आला आहे त्या पॉइंटवर मी घरात न थांबणारा, मी बेजबाबदार नागरिक मी “सेल्फिश “अशा आशयाचा फलक करण्यात आला असून विनाकारण बाहेर पडलेल्या वाहनचालकांचा सेल्फी पॉइंटवरून फोटो करण्यात येतो आणि त्यांना दंडही होतो व बाहेर पडल्याबद्दल बसवुन ही ठेवण्यात येते.जर अशा सेल्फी पॉइंटवर आपला फोटो नको असेल तर बाहेर न पडणे हेच बरे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!