गणेश कुष्ठरोग वसाहतीमधील नागरिकांनी घेतला लाभ
आर. झुनझुनवाला शंकर आय हॉस्पिटलचे विशेष सहकार्य
पनवेल दि.२१: पनवेल तालुका प्रेस क्लब आणि आर. झुनझुनवाला शंकर आय हॉस्पिटल तर्फे नुकतेच पनवेल मधील गणेश कुष्ठरोग वसाहतीमध्ये मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याशिबिराचा वसाहतीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
याप्रसंगी पनवेल महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते, पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, सल्लागार गणेश कोळी, सल्लागार विजय पवार,शंकर आय हॉस्पिटल चे प्रमुख राजेश कापसे, यांच्यासह वसाहतीतील रहिवासी उपस्थित होते.
या तपासणीनंतर शंकर आय हॉस्पिटल मध्ये पूर्ण मोफत उपचार केले जाईल असेही याप्रसंगी कापसे यांनी सांगितलं तर आतापर्यंत महाराष्ट्रात जवळपास 30000 शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याचाही नमूद करण्यात आलं. तर कुष्ठरोग्यांची यापूर्वीची काय व्यथा होती आणि महापालिकेच्या प्रयत्नामुळे त्यांना समाजात एक जीवनमान उंचावल्याचा अनुभव स्थानिक नागरिकांनी सांगितला, त्याचबरोबर पनवेल महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते यांनी महापालिका ही तुमच्या हक्काची आहे आणि त्यामुळे तुमच्या सोबत सदैव उभी आहे असं आश्वासन देत तेथील नागरिकांना प्रोत्साहन दिलं तसेच पनवेल तालुका प्रेस क्लब सातत्याने असे उपक्रम राबवते आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरवद्गार उपायुक्त वैभव विधाते यांनी काढले.
पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांच्या प्रयत्नामुळे दुर्लक्षित असणाऱ्या या वस्तीमध्ये नेत्र तपासणी शिबिर राबवल्यामुळे वसाहतीमधील नागरिकांनी आभार मानले त्याचबरोबर प्रशांत शेडगे यांनी प्रेस क्लबच्या वतीने सातत्याने गोरगरिबांसाठी उपक्रम राबवणार असल्याचेही सांगितलं.
![]()
