पनवेल दि.२१: कुडाळदेशकर आद्यगौडब्राम्हण पनवेल आणि ओरायन मॉल पनवेल यांच्या संयुक्तविद्यमाने सामाजिक उपक्रमाअंतर्गत, नेहरु सायन्स सेंटर, मुंबई यांच्या सहयोगाने ओरायन मॉल पनवेल येथे विद्यार्थी साठी “ऐक अद्भुत प्रयोगशाळा” हे सायन्स प्रदर्शन आयोजित केले होते.
खरंतर हे प्रदर्शन व त्यातील मुलांसाठीचे वर्कशॉप याचे शुल्क रुपए ३०० येवढे होते. परन्तु तळागाळातील शाळेतील विद्यार्थीना ही प्रदर्शन बधता यावी या साठी कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण संस्था पनवेल व ओरायन मॉल यांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत, बालग्राम अनाथ आश्रम पनवेल आणि जिल्हा परिषद शाळा, कराळे वाडी, जिल्हा कर्जत येथील विद्यार्थी साठी हे प्रदर्शनी विनामुल्य दाखवायचे ठरवले. या सायन्स प्रदर्शना चा मनमुराद आनंद मुला मुलीनी घेतला. नेहरु सायन्स सेंटर येथुन आलेल्या स्वयंसेवकांनी प्रर्दशनातील प्रत्येक प्रयोग व त्या मागचे सायन्स मुलांना समजावून सांगीतले. वस्तुच्या चढ ऊतारा चे प्रयोग, बिंदु डोळ्या समोरुन नाहीसा होणे, दृष्टि भ्रम अशा अनेक प्रयोगाचे प्रात्यक्षिक दाखवून नंतर सर्व मुलांना सगळे प्रयोग स्वतः अनुभवण्यास सांगीतले. नंतर सर्व मुलांचे सायन्स वर्कशॉप घेतले. प्रत्येकाला काही वस्तू देऊन प्रयोग करायला सांगितले व पुस्तकातले सायन्स कसे प्रयोगातून अनुभवायला मिळते याची माहिती दिली. या नंतर सर्व विद्यार्थ्यांना ऑरायन मॉलच्या फुड कोर्ट मधे अल्पउपहारा साठी बर्गर दिला गेला त्याचा आनंद मुलांसाठी वेगळाच होता. मुला मुलींचा तो दिवस आमच्या साठी खास होता, सायंन्स प्रदर्शनाने खुप माहिती मिळाली असे त्यांनी सांगीतले. ऑरायन मॉल चे मालक व कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण चे अध्यक्ष मंगेश परुळेकर यांनी सांगीतले की, समाजाच्या तळागाळातील मुलांची या सायन्स प्रदर्शना मुळे शिकण्याची गोडी वाढावी, त्यांना प्रेरणा मिळावी हा मागचा उद्देश आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुन बरे वाटले व शिक्षकांनी ही आम्हाला धन्यवाद दिले. असेच ऊपक्रम आम्ही पुढेही राबवणार आहोत असे ते म्हणाले. या सामाजिक उपक्रमासाठी कुडाळदेशकर आद्य गौड़ ब्राह्मण पनवेल संस्थे तर्फे शाम वालावलकर, अक्षय वालावलकर निशा वालावलकर, भाऊ सामंत, यतीन ठाकुर परिश्रम घेतले.

🛑Khelo India Beach Games:🔸कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाळा स्पोर्ट्स च्या तेजा सपकाळ हिची निवड !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!