वाहने चालवायची कशी पाऊस पडल्याने फेसच फेस
कळंबोली दि.२० (दीपक घोसाळकर) शनिवारी सकाळी कळंबोली सर्कल मध्ये दोन टेलरची समोरासमोर टक्कर होऊन जेएनपीटीकडे वाहून येणाऱ्या ट्रेलर मधील कंटेनर आपटल्याने त्यातील शाम्पू हा कळंबोली सर्कल मध्ये पसरला. त्यावेळेला मोठी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. कळंबोली अग्निशामक दलासह अन्य जवानांनी रस्त्यावर पडलेल्या शाम्पू पाच आगीच्या बोंबांनी धुऊन काढला. मात्र या वेळेला मोठ्या प्रमाणावर कडकडीत ऊन पडल्याने पडलेला शाम्पू हा तसाच रोडवर सुकून राहिला. मात्र आता पावसाची सुरूवात झाल्याने या शाम्पू मधून मोठ्या प्रमाणावर कळंबोली सर्कल मध्ये फेस जमा झाला आहे .रस्ता चिकट झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करून वाहन चालवावी लागत आहेत. अनेक वाहन चालक घसरून पडल्याने जखमीही झालेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या फेसाने वाहन चालकांच्या तोंडाला फेस आल्याचे आता बोलले जात आहे. जोपर्यंत मुसळधार पाऊस पडून सदरचा शाम्पू वाहून जात नाही तोपर्यंत या कळंबोली सर्कल मध्ये वाहनचालकांना या शाम्पूशी सामना करावा लागणार आहे.
१७ ऑगस्ट रोजी सकाळी कळंबोली सर्कल मध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने मोठा ट्रेलर उलटला. या ट्रेलर मधून थायलंड कडे जाणारा तब्बल २६ हजार किलो कॅस्टीन ऑइल म्हणजेच शाम्पू हा रस्त्यावर पसरला. यावेळी अनेक वाहने घसरल्याने नागरिक ही जखमी झाले. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली, अग्निशामक दल प्रमुख सौरभ पाटील यांनी पाच तासाच्या प्रयत्नाने सदरचा शाम्पू हा धुऊन काढला. मात्र यावेळी कडकडीत ऊन पडल्याने बाजूला राहिलेला शाम्पू हा सुकून तसाच राहिला. मंगळवारी दुपारपासून पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केल्याने हा शाम्पू पूर्ण ओलसर झाला. त्यातून मोठ्या प्रमाणावर फेस निर्माण झाल्याने सर्कलच्या चारही बाजू कडून फेसच फेस वाहन चालकांना दिसू लागला. या फेसांमध्ये शाम्पूचा चिकटपणा असल्याने अनेक वाहन दुचाकी स्वार घसरल्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये दुचाकी स्वार जखमी झाल्याचेही समोर आले आहे. आता कळंबोली सर्कल मध्ये सर्वत्रच शाम्पूचा फेसाचा मोठा थर निर्माण झाला आहे. यातून मार्गस्थ करून या फेसाशी सामना करून वाहनचालकांना मार्गस्थ व्हावे लागत आहे.