पनवेल दि.02: आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री.बापुसाहेब डी. डी. विसपुते बी.एड.कॉलेज व मुंबई विद्यापीठ , ठाणे उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त  “महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण भारत – नई तालीम” या विषयावर ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी महात्मा गांधीजींचे पुरोगामी विचार आजच्या पिढीसाठी किती महत्वपूर्ण आहेत हे स्पष्ट करत महात्मा गांधींच्या कार्याचे विविध पैलू उलगडून दाखवत या माध्यमातून चिरंजीवी विकास कसा साधता येईल व याच विचारांच्या आधारावर बेरोजगारी सारख्या समस्यांवर कशी मात करता येईल हे सांगत विद्यार्थ्यांना एक नवी दिशा दाखवली. तर महात्मा गांधी नॅशनल काऊन्सिल ऑफ रुरल एज्युकेशन, शिक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या मनीषा करपे यांनी महात्मा गांधी व नई तालीम यातील संबंध स्पष्ट केला. मुंबई विद्यापीठ , ठाणे उपकेंद्राच्या संचालिका डॉ.सुनिता मगरे यांनी विद्यापीठाची यातील भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा कांबळे यांनी आपल्या  प्रास्तविकातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करत सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांनी महात्मा गांधी यांच्या  विचारप्रणालीनुसार व आदर्श समूहाचे कसे कार्य करते हे स्पष्ट करत भविष्यातही आपण या साठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

आभासी दीपप्रज्वलन, महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांचा माहितीपट ,नई तालीमवरील कार्याची ध्वनिचित्रफीत, वैष्णव जन हे भजन या मुळे आजच्या विद्यार्थ्यांना नव्याने गांधीजी व शास्त्रीजी समजले.. सदर कार्यक्रमासाठी झूम वर १०० विद्यार्थी तर फेसबुक वर ३,३१४ इतक्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम पहिला.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!