ठाणे दि.01: एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुसर्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हणतात.

आज पासून सुरू होणार्या आॅक्टोबर महिन्यात तसा ब्ल्यू मून योग येत आहे. आज १ आॅक्टोबर रोजी अधिक आश्विन पौर्णिमा आहे. तर ३१ आॅक्टोबर रोजी निज आश्विन पौर्णिमांव्यतिरिक्त आहे. त्यामुळे ३१ आॅक्टोबरचा चंद्र ‘ब्ल्यू मून’ असणार आहे. यावेळी चंद्र काही ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचा दिसत नाही. हा योग कधीतरी येतो, म्हणून दुर्मिळ घडणार्या घटनांचा उल्लेख ‘वन्स इन ब्ल्यू मून‘ असा करतात असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. यापूर्वी ३१ मार्च २०१८ रोजी असा योग आला होता. आता यानंतर ३१ आॅगस्ट २०२३ रोजी ब्ल्यू मून योग येणार आहे अशी माहितीही सोमण यांनी दिली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!