पनवेल दि.२५: भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षाचे ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतत्वाखाली पनवेल विधानसभा मतदार संघात जोरदार प्रचार करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज पनवेल ग्रामीण भागात झालेल्या झालेल्या प्रचार दौऱ्याला व चौकसभांना मतदार नागरिकांचा जोरदार उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
देशाचा सर्वात मोठा उत्सव लोकसभा निवडणुक आहे. या अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे अनेक निर्णय आणि योजना राबविल्या जातात. आणि लोकशाहीच्या रूपाने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे प्रत्यक्ष कामातून कृती करण्याचे काम करत आहेत. पाचशे वर्षांपासून सुरू राहिलेल्या राम मंदिराची लढाई जिंकण्याची आणि न्याय देण्याचे काम मोदीजींनी केले आहे. देशाची संस्कृती परंपरा वृध्दींगत करण्याबरोबरच सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याचे काम करत देशाचे नाव जगात उज्वल करण्याचे आणि देशाला जागतिक पातळीवर मोठी उंची देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केले आहे. पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काम करण्याची आणि लोकसभा मतदार संघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि विकासाची गंगा यापुढेही सुरू ठेवण्यासाठी आपले बहुमूल्य मत मला द्या, असे आवाहनही खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी मतदारांना केले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणि विकासकामे मावळ लोकसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून केल्याचे त्यांनी नमूद करून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल विधानसभा मतदार संघात केलेली विकासकामे आपल्या जमेची बाजू असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
पाठीमागील अडीच वर्षे सत्तेत असतानाही विरोधकासारखे होतो असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेता लगावला. तसेच केंद्रातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादाची ताकद जनकल्याणासाठी खंबीरपणे उभी आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली.गेली दोन टर्म माझ्यावर विश्वास टाकून विजयी केले आणि यावेळीही प्रचंड मतांनी विजयी कराल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली.

शेडुंग येथील हनुमान मंदिरात दर्शनघेऊन प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. पुढे बेलवली, लोणीवाली, वांगणी, आंबिवली, नेरे असा प्रचार दौरा झाला.त्यानंतर वाजे येथे चौकसभा झाली. त्यानंतर शिवणसई, दूंदरे, रिटघर, खानाव, मोर्बे, महालुंगी, चिंध्रण, पालखुर्द, वावंजे येथे प्रचार दौरा त्यानंतर खैरणे येथे चौकसभा होऊन पुढे नितळस, तोंडरे, पेंधर येथे प्रचार दौरा आणि नंतर नावडे व फेज २ ची चौकसभा झाली. या प्रचार दौऱ्यात उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी महापौर कविता चौतमोल, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, संतोष भोईर, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी, सुनील फडके, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, मनसेचे तालुका प्रमुख रामदास पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दर्शन ठाकूर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, माजी जिल्हा परिषद अमित जाधव, एकनाथ देशेकर, माजी पंचायत समिती सदस्य राज पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, जिल्हा सरचिटणीस संध्या शारबिद्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!