अलिबाग दि.२४: जिल्ह्यातील मतदार संख्येत वाढ होऊन 9 एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण 23 लाख 66 हजार 58 मतदार नोंदणी झाली आहे. 23 जानेवारीनुसार जिल्ह्यात 23 लाख 16 हजार 515 मतदार होते. एकूण मतदार संख्येत जिल्ह्यात एकूण 49 हजार 543 इतकी वाढ झाली आहे.
यापैकी 32 रायगड लोकसभा मतदार संघात 9 एप्रिल अखेर एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार असून पुरुष मतदार 8 लक्ष 20 हजार 605 महिला मतदार 8 लक्ष 47 हजार 763 व तृतीयपंथी चार मतदार आहेत. तर मतदार संघात 14 हजार 437 वाढ झाली आहे.
23 जानेवारीच्या नुसार मतदार संघात 16 लाख 53 हजार 935 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8 लाख 13 हजार 51, तर स्त्री 8 लाख 40 हजार 416 आहेत.
मतदार संघात पुरुष मतदारांमध्ये 7 हजार 90 तर स्त्री मतदारांमध्ये 7 हजार 347 वाढ झाली आहे.
वयोवृद्ध 85 वर्षावरील मतदार व दिव्यांग मतदार घरून मतदान करणार असून 3 हजार 63 मतदारांनी यासाठी निवडणूक प्रशासनाकडे मागणी नोंदवली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणालें, जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तीन कंपनी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यापैकी एक कंपनी अलिबाग येथे दाखल झाली आहे. गुन्हेगारविरोधात पोलीस विभागाने अजामीनपात्र, फरार, वॉन्टेड व्यक्ती विरोधात मोहीम राबवली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 239 पैकी 216 व्यक्ती वर प्रतिबंधात्मक कारवाई केली. निवडणूक घोषित झाल्यानंतर मतदार संघात प्रतिबंधात्मक कारवाई करत 12 लाख 75 हजार रुपये किमतीची अवैध दारू व 60लाख 18 हजार रुपये बेहिशेबी रोख रक्कम विविध कारवाई मध्ये जप्त करण्यात आली.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!