पनवेल दि.5: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू केला असून या हिंसाचारात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात आले आहेत. या राजकीय हिंसाचाराचा उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. 
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल मध्ये पक्ष कार्यालयाजवळ कोरोना संदर्भातील नियम पाळून जोरदार निदर्शने करण्यात आली. 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे प्रकार घडत आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे त्या निषेधार्थ भाजपाच्यावतीने निदर्शने करण्यात आली.विशेष म्हणजे या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही सहभाग घेऊन पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराचा व ममता बॅनर्जी सरकारचा निषेध नोंदवला.

यावेळी ‘भाजप कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्या ममता सरकारचा निषेध असो’, ‘ममता सरकार हाय हाय’, ‘लोकशाहीची हत्या करणाऱ्या ममता सरकारचा धिक्कार असो’, ‘बंद करा बंद करा दादागिरी बंद करा’, अशा गगनभेदी घोषणा देऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. 

या आंदोलनात भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, मुकीद काझी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका नीता माळी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा नेते दिनेश खानावकर, अनेश ढवळे, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, शिक्षक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष के.सी. पाटील, रविंद्र नाईक, स्नेहल खरे, प्रकाश खैरे, प्रितम म्हात्रे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत जुमलेदार, चंद्रकांत मंजुळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!