पनवेल दि.02: उलवे नोडमधील नागरिकांसाठी कोपर येथील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून महत्त्वाची सोय झाली आहे.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात उभारण्यात आलेल्या 60 बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रविशेठ पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, बीव्हीजी समुहाचे हणमंतराव गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्रीनंद पटवर्धन, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सभापती देवकी कातकरी, उद्योजक जे. एम. म्हात्रे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात फडणवीस म्हणाले की, आपण अतिशय वेगाने या संकटातून बाहेर येऊ असा मला विश्वास वाटतोय. अशा वेळेस प्रयत्नांमध्ये आमचे आमदार आपापल्या परीने प्रयत्न करताहेत. याचा एक भाग म्हणून हे सुसज्ज कोविड सेंटर आहे. याचा येथील रुग्ण नागरिकांना फायदा होईल. सध्या कोविडची लढाई आहे ती लढू या, असेही फडणवीस म्हणाले.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!