पनवेल दि.01: पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी आय. सी. यु. बेड उपलब्ध करून देण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला होता. या अनुषंगाने मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एमजीएम रुग्णालयात ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेकडून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात २०० आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येणार असून, आज त्या अनुषंगाने सुरुवातीला १०० आयसीयू बेड उपलब्ध झाले असून, त्यामध्ये व्हेंटिलेटर बेडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमजीएम कामोठे रुग्णालयात आणखी २०० बेडची उपलब्धता करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्याचबरोबर या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्याबरोबरच त्यांची मुंबईत प्रत्यक्ष भेट घेऊन वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात २०० आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. आज १०० बेड्स उपलब्ध झाले असून त्यानंतर १५ मेपर्यंत उर्वरित १०० आयसीयू बेडची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यातही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २०० ऑक्सिजन बेडसाठी साहित्य खरेदीस येणार्‍या खर्चाला पनवेल महापालिकेच्या महासभेत प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली होती.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!