अलिबाग दि.३०: रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच २६३ नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात १४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याने बरे झालेल्यांची संख्या २३३७ वर गेली असून आतापर्यंत १४७५ जणांवर उपचार सुरु आहेत. आज सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा १२७, पनवेल ग्रामीण ५४, उरण १२, खालापूर २१, कर्जत ३, अलिबाग २३, मुरुड १, रोहा १६, महाड ६ असे एकूण २६३ रुग्ण सापडले असून आज पनवेल मनपा परिसरातील १ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. मात्र आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल मनपा ८४, पनवेल ग्रामीण ७, उरण ६, कर्जत १३, पेण २, अलिबाग १७, रोहा ११, पोलादपूर २ असे एकूण १४२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या १४७५ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत २३३७ जणांनी जिल्ह्यात कोरोनावर मात केली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!