पनवेल दि.30: पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्या दोन हजारांच्या वर गेलेली आहे. आज पर्यंत कामोठे व खारघर वगळता उर्वरित भागात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात होते. मात्र आता दाट लोकवस्तीच्या भागातदेखील रुग्णांचा आढळ होत आहे. लॉक डाऊन शिथिल होत असल्यामुळे लोकांचा संचार वाढला आहे. गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन करून देखील नागरिक घराबाहेर पडत आहेत.
लहान मोठ्या खरेदी करण्यासाठी घरातील एका पेक्षा जास्त सदस्य बाहेर जात आहेत. यामुळे बाहेरच्या लोकांशी संपर्क वाढला आहे. त्यात ही काही बेजबाबदार नागरिक मास्क चा वापर करत नाहीत. सॅनिटायझर चा वापर करत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी चारही प्रभागात विना मास्क फिरणा-या नागरिकांना व दुकानदारांना दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. खारघर, कळंबोली, कामोठे व पनवेल या चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी हे अतिक्रमण विरोधी पथकाच्या माध्यमातून कारवाई करत असून आतापर्यंत मास्क न लावलेल्या १६२ नागरिकांकडून दंड स्वरूपात एकूण १६ हजार दोनशे रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!