अलिबाग दि. 20 :-स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 34 हजार 617 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 554 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-212, पनवेल ग्रामीण-46, उरण-23, खालापूर-36, कर्जत-25, पेण-43, अलिबाग-69, मुरुड-3, माणगाव-29, रोहा-36, सुधागाड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-7, महाड-14, पोलादपूर-7 असे एकूण 554 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 10 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-1, कर्जत-2, अलिबाग-2, तळा-1, रोहा-3, सुधागड-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 115, पनवेल ग्रामीण-749, उरण-197, खालापूर-279, कर्जत-253, पेण-469, अलिबाग-582, मुरुड-41, माणगाव-364, तळा-45, रोहा-371, सुधागड-68, श्रीवर्धन-45, म्हसळा-44, महाड-132, पोलादपूर-57 अशी एकूण 5 हजार 811 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-13 हजार 978, पनवेल ग्रामीण-4 हजार 443, उरण-1 हजार 454, खालापूर-1 हजार 957, कर्जत- 1 हजार 155, पेण-2 हजार 722, अलिबाग-3 हजार 276, मुरुड-277, माणगाव- 1 हजार 217, तळा-91, रोहा-1 हजार 661, सुधागड-281, श्रीवर्धन-283, म्हसळा-239, महाड- 1 हजार 306, पोलादपूर-277 अशी एकूण 34 हजार 617 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-192, पनवेल ग्रामीण-60, उरण-7, खालापूर-35, कर्जत-27, पेण-56, अलिबाग-100, मुरुड-23, माणगाव-36, रोहा-63, सुधागड-1, म्हसळा-4, महाड-28, पोलादपूर-5 असे एकूण 637 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-370, पनवेल ग्रामीण-89, उरण-86, खालापूर-93, कर्जत-62, पेण-86, अलिबाग-88, मुरुड-21, माणगाव-25, तळा-8, रोहा-59, सुधागाड-18, श्रीवर्धन-18, म्हसळा-11, महाड-55, पोलादपूर-15 असे एकूण 1 हजार 104 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 43 हजार 687 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 288 आहे.