अलिबाग,दि.16 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 385 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 43 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-21, पनवेल (ग्रा)-4, उरण-7, कर्जत-1, पेण-1, अलिबाग-9 अशा प्रकारे एकूण 43 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 2 व्यक्तींची (पनवेल मनपा-1, अलिबाग-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-259, पनवेल ग्रामीण-69, उरण-21, खालापूर-3, कर्जत-15, पेण-12, अलिबाग-19, मुरुड-4, माणगाव-7, रोहा-1, म्हसळा-11, महाड-6 अशी एकूण 427 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-732, पनवेल ग्रामीण 231, उरण-167, खालापूर-10, कर्जत-26, पेण-20, अलिबाग-8 मुरुड-13, माणगाव-49, तळा-12, रोहा-23, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-18, महाड-15 पोलादपूर-20 अशी एकूण 1 हजार 385 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-23, पनवेल ग्रामीण-6, उरण-1,कर्जत-1, पेण-2,अलिबाग-2, महाड-5, असे एकूण 40 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-46, पनवेल ग्रामीण-11, उरण-1, खालापूर-1, कर्जत-5, अलिबाग-4, मुरुड-2, माणगाव-1, तळा-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-5, पोलादपूर-1 असे एकूण 84 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 5 हजार 654 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 3 हजार 705 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 53 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 1 हजार 896 आहे.