पनवेल दि.16: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘माय लाईफ माय योगा’ वर आधारित रेकॉर्डेड व्हिडीओ २०२० स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग १९ च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
हि स्पर्धा पनवेल महापालिका क्षेत्रासाठी मर्यादित असून सहा गटात होणार आहे. प्रत्येक गटासाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकास ५५५५ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक ३३३३ रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक २२२२ रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकास ११११ रुपये व आकर्षक चषक अशी एकूण ८० हजार रुपयांची बक्षिसे आहेत. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १९ जून असून स्पर्धकाने आपला सूर्यनमस्काराचा ३ मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ७५०२१००१०० किंवा ७७५७०००००० या क्रमांकावर व्हाट्सअँप करावा. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांचा व्हिडिओ २१ जून रोजी ‘ जागतिक योग दिवस’ या दिवशी फेसबुक पेजवर प्रसारित केले जाणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले आहे. 

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!