अलिबाग, दि.13 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 238 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 57 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-37, पनवेल (ग्रा)-16, उरण-2, अलिबाग-1, माणगाव-1, अशा प्रकारे एकूण 57 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात तीन व्यक्तींची (पनवेल मनपा-2, माणगाव-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-251, पनवेल ग्रामीण-64, उरण-19, खालापूर-3, कर्जत-7, पेण-12, अलिबाग-6, मुरुड-3, माणगाव-6, रोहा-1, म्हसळा-11, महाड-7, पोलादपूर-7 अशी एकूण 397 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-638, पनवेल ग्रामीण 212, उरण-159, खालापूर-10, कर्जत-24, पेण-13, अलिबाग-36, मुरुड-13, माणगाव-46, तळा-12, रोहा-23, सुधागड-2, श्रीवर्धन-9, म्हसळा-18, महाड-10 पोलादपूर-13 अशी एकूण 1 हजार 238 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-22, पनवेल ग्रामीण-2, तळा-1 असे एकूण 25 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-39, पनवेल ग्रामीण-11, उरण-1, खालापूर-1, कर्जत-4, अलिबाग-3, मुरुड-2, माणगाव-1, तळा-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-3, महाड-5, पोलादपूर-1 असे एकूण 74 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 5 हजार 324 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी 3 हजार 506 नागरिकांचे रिपोर्ट ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 109 आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तपासणी अंती ‘+’ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या 1 हजार 709 आहे.