पनवेल दि.14: रक्तगटाचा शोध लावणाऱ्या कार्ललँडस्टेनर यांचा जन्म दिवस हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून जगभर पाळण्यात येतो त्याअनुषंगाने या वर्षी ७ जून ते १४ जून दरम्यान जागतिक ब्लड डोनर आठवडा साजरा करण्यात येत आहे या दिवसाचे औचित्य साधून पनवेल मधील श्रीराम जोशी यांनी
१४१ वेळा प्लेटलेट डोनेट करण्याचा विक्रम केला आहे
सन 2004 मध्ये जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस, रेड क्रेसेट सोसायटीचे आंतरराष्ट्रीय फेडरेशन यांनी 14 जून रोजी सर्वप्रथम “रक्तदाता दिवस “साजरा केला. जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटी (Red Crescent Societies), आंतरराष्ट्रीय फेडरेशन आँफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन (IFBDO) आणि इंटरनॅशनल सोसायटी आँफ ब्लड ट्रान्सफ्यूजन इम्यूनो हिमॅटोलॉजी (ISBTl) या सारख्या हेल्थ केअर एजन्सीज संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय संघटना आयोजित करतात. जागतिक स्तरावर लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम करतात. सन 2004 च्या सुरुवातीला स्वस्थ व्यक्तीने स्वेच्छेने आणि न चुकता केलेले रक्तदान हे समाजात आवश्यक लोकांची जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने सुरु केला होता.
जागतिक रक्तदाता दिवस अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेने सन 1952 मधील 192 सदस्यासह सन 2005 मध्ये 58 व्या जागतिक आरोग्य परिषदेत स्थापन केला. या वर्षीचे स्लोगन “Give Blood And Make World A Healthier Place. रक्तदान करा आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा.”
शरीरात रक्त व त्यांचे इतर घटक यामुळेच शरीरातील अनेक प्रक्रिया चालतात. सर्व शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा रक्तपेशींमुळेच होता शिवाय रोगप्रतिकारशक्तीही रक्तातील लढवय्या पेशींमुळे चालू असते. मानवाच्या शरीरात ए, बी, एबी, ओ असे चार प्रकारचे रक्तगट असतात. तसेच आर. एच. फॅक्टर पॉझिटिव व निगेटिव्ह असे दोन प्रकार आहे. ए,बी, ओ या रक्तगटाचा शोध डॉ. कार्ललँडस्टेनर यांनी 1900 साली लावला. तसेच आर एच फॅक्टर शोध आणि सन 1909 साली पोलिओ विषाणूचा शोध लावून त्यांनी जगात प्रसिद्धी मिळविली. त्यांच्या या शोधासाठी योगदानाबद्दल 1930 साली त्यांना आरोग्य व औषधशास्रातील योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर 1902 साली ‘एबी’ या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. सन 1940 साली डॉ.कार्ललँडस्टेनर व ए.एस. व्हिनेर (Weiner) यांनी Rhesus नावाच्या माकडांमध्ये एक विशेष प्रकारचे प्रतिजन सापडले. त्याला Rh (आर एच) फॅक्टर असे नाव दिले. अशा प्रकारे डॉ. कार्ललँडस्टेनर यांच्या योगदानाबद्दल त्यांना ” रक्तगटाचा जनक” म्हणतात. रस्त्यावर होणारे अपघात त्याच बरोबर चारही रक्त गटातील इतर रुग्णांना रक्ता बरोबर प्लेटलेट खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत असल्याने नागरीकांमधून रक्तदाना ची फार मोठी गरज असते हीच सामाजिक बांधिलकी जपून आपल्या वडिलांच्या प्रेरणेने पनवेल मधील श्रीराम जोशी यांनी २६ फेब्रुवारी २०१४ पासून प्लेटलेट डोनेट करायला सुरुवात केली आणि आज पर्यंत १४१ वेळा प्लेटलेट आणि २६ वेळा रक्तदान केले आहे. जागतिक रक्तदाता दिवसाचे औचित्य साधून दि १३ जून रोजी आपले १४१ वे प्लेटलेट दान त्यांनी खारघर मधील टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये केले .सध्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत असून सोशल डिस्टन्स पाळून आपण रक्तदान करावे असे आवाहन श्रीराम जोशी यांनी केले आहे.