कळंबोली दि.२६: नाताळ मध्ये रंगीबेरंगी कपड्यांनी आकर्षित करणारा सांताक्लॉज आपण नेहमीच पाहतो. ख्रिसमस साठी सारे जग विद्युत रोषणाईने रंगेबिरंगी कपड्यांनी नाहून निघते. क्रिसमस चे स्वागत करण्यासाठी नवीन पनवेल मधील करण दिलीप घरत यांनी आपल्या पोलो कारला ख्रिसमस निमित्त विद्युत रोषणाईने झगमगून टाकले आहे. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईने झगमगून गेलेल्या पोलो कार सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने चालत्या गाडीला विविध रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून टाकलेली कार पाहण्याची संधी पनवेल सहित नवी मुंबईकरांनाही मिळाल्याने सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलो कार सर्वांचेच आकर्षक बनली आहे.
नाताळनिमित्त ख्रिश्चन बंधू भगिनी आपल्या घराला, व्यवसायाच्या ठिकाणी ,दुकानाला विद्युत रोषणाईने झगमगून टाकतात .ख्रिसमस चे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले जाते. मुंबईसह उपनगरात ही ख्रिसमस मोठ्या आनंदात साजरा केला जातो. परंतु नवीन पनवेलच्या करण दिलीप घरात या हौशी कार चालकाने आधुनिकतेचा कल्पकतेने वापर करून आपल्या पोलो कारला विविध रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने नाहून टाकले आहे .त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरून चालणारी पोलो कार झगमगटाने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. ख्रिसमस चे स्वागत एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याची किमया ही करण घरत यांनी साधल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चालत्या फिरत्या गाडीला विद्युत रोषणाई करणे तसेच जिकरीचेच असते. परंतु आधुनिकतेचा योग्य वापर करून आपली हौस अन छंद पूर्ण करण्यासाठी करण घरत यांनी चालत्या गाडीला विद्युत रोषणाई केल्याने एक चर्चेचा विषय बनला आहे. ख्रिसमस निमित्त आगळी वेगळी कार पनवेल, नवी मुंबई च्या रस्त्यावरून फिरताना सर्वांचेच आकर्षक बनली आहे .ज्या ज्या ठिकाणी ही क्रिसमस कार जाते फिरते त्या ठिकाणी अनेक तरुण-तरुणी गाडीसोबत सेल्फी घेण्याचाही मोह अन छंद पूर्ण करताना दिसून येतात.