रायगड दि.26:- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाचा पदभार स्वीकारल्या नंतर बस स्थानकांना भेटी देण्यास सुरवात केली आहे. त्यांनी पनवेल बस स्थानकाची पाहणी करून येथील बस सेवा, कर्मचाऱ्यांच्या सुविधा आणि व्यवस्थापनाचा सखोल आढावा घेतला. स्वच्छता गृह, सर्वसामान्य प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा आणि महिला विश्रांती कक्षाच्या दर्जा उंचावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
विद्यार्थ्यांशी संवाद साधून बस वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि या समस्येवर त्वरित उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले. प्रवाश्यांनी सांगितलेल्या समस्यांवर त्वरीत निवारण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पनवेल बस आगार हे कोकणातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी अधिक चांगल्या व सोयीस्कर सेवा पुरवण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच  पनवेल ते खोपोली असा बस प्रवास करत बस मधील प्रवासी यांचे सोबत संवाद साधला तद्नंतर परिवहन मंत्री यांनी खोपोली बस स्थानकाचा आढावा घेत परिवहन विभागाचे अधिकारी यांच्याकडून अधिकची माहिती देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली.
यावेळी परिवहन विभागातील अधिकारी उपस्थित होते

🔸गव्हाण येथील आगरी – कोळी बांधवांनी घेतले वेताळ देवाचे दर्शन !

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!