पनवेल दि.२६: सालाबादाप्रमाणे यावर्षीही न चुकता गव्हाण येथील आगरी कोळी बांधवानी मोठ्या भक्तीभावाने उरण मोरा येथून समुद्रमार्गे बोटीने प्रवास करत खंदेरी या किल्ल्यावर जात असतात. दरवर्षी भक्तगणात वाढ होत असते. यावर्षी किमान साठ ते सत्तर भाविक सहभागी झाले होते. भक्तिमय वातावरणात आणि कोळीगीतांच्या तालावर वाजत गाजत बँड पथक घेऊन वेताळ देवाला साकडं घालण्याकरता येथे भक्तगण येत असतात . येथील आख्यायिकामध्ये सांगण्यात येते की, वेताळ देवाची शिला दरवर्षी इंचा इंचाने वाढत असते. वेताळदेव म्हणजे शिवशंकराचा अवतार मानले जातात .
      रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनानुसार वेताळ देवाचे भक्त मनोज फडकर हे कार्यक्रमाचे अतिशय उत्तमरीत्या नियोजन करत असतात. सर्वांना सुखशांती लाभो व सर्वांची भरभराट होऊन इतरांना मदत करण्याची सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना वेताळदेवाला यावेळी महेंद्र घरत यांनी केली. यावेळी MG ग्रुप चे किरीट पाटील, वैभव पाटील, प्रशांत पाटील, मुरलीधर ठाकूर, लक्ष्मण ठाकूर, योगेश रसाळ, अजित ठाकूर, राजेंद्र भगत, प्रित म्हात्रे, निखिल गावंड, मेहबूब लदाफ तसेच महेंद्र घरत यांचे मित्रमंडळी व सहकारी उपस्थित होते.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!