पनवेल दि.२१: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक २२ जुलै पनवेलमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल उत्तर मंडलाचे रक्तदान शिबीर रामशेठ ठाकूर महाविद्यालय, सेक्टर ३, पेठगाव येथे, खारघर शहर मंडल शिबीर रामशेठ ठाकूर स्कुल, सेक्टर १९, खारघर येथे, कामोठे शहर मंडल शिबीर आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय सेक्टर ३६, कामोठे येथे, कळंबोली शहर मंडल शिबीर आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय सेक्टर ८ कामोठे येथे, पनवेल शहर मंडल शिबीर भाजप मध्यवर्ती कार्यालय पनवेल येथे, नवीन पनवेल मंडलाचे शिबीर रोटरी ब्लड बँक खांदा कॉलनी तर पनवेल पूर्व मंडलाचे शिबीर सेंट अँड्रयू स्कुल आकुर्ली येथे होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध विधायक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये वृक्षारोपण दिव्यांग बांधवांना मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप यांसारख्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे. पनवेलमध्ये रक्त संकलन करण्याचा उद्देश ठेवून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिरात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभाग घेऊन हे सामाजिक उपक्रम यशस्वी करावे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी केले आहे.

🛑ट्रेलर मधून किमती ऐवज चोरणारी चौकडी गजाआड🔹दोन दुचाकी सह १५ मोबाईल हस्तगत

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!