पनवेल दि.०१: राज्यात कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परिक्षा उमेदवारांना वयोमर्यादेचा कालावधी वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात म्हंटले कि, राज्यात कोरोनाच्या काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादितील सवलतींचा कालावधी वाढवून देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी डिसेंबर २०२२ मध्ये वा त्यादरम्यान मा. मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती देण्यासंदर्भात जाहिराती प्रसिध्द न झाल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडली गेल्यामुळे स्पर्धा परिक्षेस बसण्याची त्यांची संधी हुकली असल्याचे निदर्शनास आले आहे, असे असल्यास या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, तसेच कोरोनाच्या काळात कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील स्पर्धा परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना सरळसेवा परिक्षेस बसण्याची संधी मिळण्यासाठी वयोमर्यादेतील सवलतीचा कालावधी वाढविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, अशी विचारणा या तारांकित प्रश्नात केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, कोरोना कालावधीत पद भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध न झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दि. १७.१२.२०२१ च्या शासन निर्णयाव्दारे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना परिक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विशेष बाब म्हणून दि. १७.१२.२०२१ ते दि.३१.१२.२०२२ या कालावधीत प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींच्या अनुषंगाने परीक्षेला बसण्याची मुभा दिली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जानेवारी २०२२ पासून डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १९१४५ इतक्या पदांकरिता १२८ जाहिराती देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सन २०१६ पासून दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींच्या सरासरी संख्येच्या तुलनेत ही संख्या दुपटीहून अधिक आहे.जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत प्रसिद्ध झालेल्या सदर जाहिरातींच्या अनुषंगाने होणाऱ्या परीक्षांना बसण्याची अतिरिक्त संधी कोविड कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना दि. १७.१२.२०२१ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार उपलब्ध झाली आहे. सबब कोविड कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांची स्पर्धा परीक्षांना बसण्याची संधी हुकली आहे, अशी वस्तुस्थिती नाही, असे उत्तरात म्हंटले आहे.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133